Bisleriचं पाणी पिता? थांबा! FSSAIच्या तपासणीत काय आढळलं, जाणून घ्या…

देशातील लोकप्रिय पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या ब्रँडपैकी एक असलेल्या बिसलेरीच्या पाण्याचा नमुना अन्नसुरक्षा तपासणीत असुरक्षित आढळल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने बिसलेरी इंटरनॅशनलविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा केला असून, कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. पाण्याच्या नमुन्यात निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ब्रोमेट आढळल्याने तो पिण्यास असुरक्षित घोषित करण्यात आला.

नेमकी काय आढळली त्रुटी?

FSSAIने बिसलेरी इंटरनॅशनलच्या परिसरातून पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा नमुना गोळा केला होता. हा नमुना मिनरल वॉटर नसून सामान्य पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा होता. प्रयोगशाळेतील तपासणीत नमुन्यात निर्धारित मर्यादांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. अन्नसुरक्षा नियामकाच्या माहितीनुसार, पाण्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत हा नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला.

अपीलानंतर पुन्हा तपासणी; तरीही नमुना असुरक्षित

कंपनीने या निष्कर्षाविरोधात अपील केल्यानंतर संबंधित नमुना पुन्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला. मात्र, या पुढील तपासणीतही नमुन्यात पॉलिन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याचे FSSAIने म्हटले आहे. पुनर्तपासणीतही नमुना असुरक्षित ठरल्याने नियामकाने बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली.

FSSAIची इतर कंपन्यांवरही कारवाई

बिसलेरीबरोबरच काही अन्य खाद्य कंपन्यांविरोधातही खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यात Vasant Masala Pvt Ltd, Tit-Bit Foods India Pvt Ltd, Mimansa Industries आणि Asha Confectionery यांचा समावेश आहे. Urmi Lifesciences LLP आणि Gaur Ayurvedic Store यांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहेत. तसेच Asha Confectioneryला प्री-पॅक चॉकलेट फिल्ड कुकीज बाजारातून मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कुकीज असुरक्षित असल्याचे आढळल्याने उत्पादन रिकॉल करण्याची कारवाई करण्यात आली.

ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पॅकेज्ड पिण्याचे पाणी म्हणजे सुरक्षित पाणी, असा ग्राहकांचा विश्वास असतो. मात्र, या प्रकरणामुळे पॅकेज्ड वॉटरच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत आणि अन्नसुरक्षा तपासणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक यंत्रणा असतानाही नमुन्यांमध्ये रासायनिक घटक आढळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे उत्पादनांच्या तपासणीची प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांची अंमलबजावणी किती प्रभावी आहे, यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.  FSSAIने नमुन्याला असुरक्षित घोषित करून कंपनीविरोधात खटल्याला मंजुरी दिली आहे. याचा अर्थ न्यायालयीन दोषसिद्धी झालेली आहे, असा होत नाही. पुढील कायदेशीर प्रक्रियेत आरोप आणि त्यावरील कंपनीची बाजू स्पष्ट होईल.

Leans left of center
1 outlet covering this story
No AI summary generated for this bucket yet.
3 Articles
- Lean Left
- केंद्राविरोधात न्यायालयात गेलेलं महाराष्ट्र सरकार आठ आठवड्यांत माघारलं! FDA-FSSAI वादात नेमकं काय घडलं?Max MaharashtraLean Left
- Lean Left
Discussion (0)
- No comments yet — be the first to weigh in.